Gondia:- अर्जुनी मोर तालुक्यातील शिरोली महागाव जवळील पेट्रोल पंपा समोर दुचाकी आणि स्कूल बस यांचा सामुरासमोर अपघात झाल्याची घटना दिनांक 18/070 24 ला 10:30 वाजता घडली.
अपघातात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू
या अपघातात मृत्यू पावलेला हरिश्चंद्र हरिदास कोहरे वय 45 वर्ष व त्याची पत्नी इंदुबाई हरिश्चंद्र कोहरे व 42 वर्ष दोघेही राहणार महागाव शिरोली आपल्या मोटरसायकलने मोटरसायकलने अर्जुनी मोर वरून महागाव कडे येत होते तर महागाव शिरोली कडून विद्यार्थी घेऊन सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरची स्कूल बस अर्जुनी मोरकडे येत असता सामोरासमोर हा अपघात (Accident) घडला. स्कूल बस क्रमांक MH 35 AJ 3634 असून गाडी चालक कुंडलिक बावनकर माहूरकुडा विद्यार्थी घेऊन येत होता. महागाव शिरोली जवळील पेट्रोल पंपासामोर(Petrol pump) अपघात झाल्याने त्या अपघातात मोटार सायकल स्वार हरिश्चंद्र कोहरे जागी ठार झाला तर त्याची पत्नी इंदुबाई कोहरे गंभीर रित्या जखमी झाल्याने तिला उपचारासाठी अर्जुनी मोर रुग्णालयात हलविण्यात आले.
शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयअर्जुनी मोर येते पाठवण्यात आले
अपघात झाल्यानंतर शालेय विद्यार्थी पायपीट करीत आपल्या घरी निघून गेले. अपघाताची माहिती पोलीस स्टेशन (Police Station) अर्जुनी मोर येथे देण्यात आली घटनास्थळी अर्जुनी मोर चे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार एस.आय.शेंडे, पो.सी आरसोळे तपास करीत आहेत. मृतक हरिचंद्र कोहरे हा विद्युत वितरण अर्जुनी मोर येथे शासकीय कर्मचारी असून रात्रची पाळी संपवून तो गावाकडे शेतीच्या कामासाठी जात असता हा अपघात घडला. शवविच्छेदनाकरिता (Autopsy) ग्रामीण रुग्णालयअर्जुनी मोर येते पाठवण्यात आले तर गाडी चालक कुंडलिक बावनकर यांना पोलीस कस्टडीत रवानगी करण्यात आली वरील तपास सुरू आहे.