लोकवर्गणीतून खरेदी केले सिसीटीव्ही कॅमेरे
कोरची (School CCTV) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मर्केकसा येथील विद्यार्थी हिताच्या दृष्टीकोनातून शालेय परिसरात (School CCTV) सिसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सिसीटीव्ही असलेली मर्केकसा शाळा ही तालुक्यातून पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.
शाळेच्या परिसर विस्तीर्ण असून विविध उपक्रम राबविले जातात शाळेमध्ये पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग आहे. शाळेत एकूण पटसंख्या 32 असून या वर्षी बाहेर गावचे पण शाळेत प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे पटसंख्या मध्ये वाढ झाली आहे. मुख्याध्यापिका कु. रेशमा कंगाली मॅडम व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश जी चौधरी यांच्या संकल्पनेतून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा दृष्टीकोनातून शिक्षक स्वखर्चाने व गाव वर्गणी गोळा करून 3 सिसीटीव्ही कॅमेरे (School CCTV) लावण्यात आलीआहे.
या शाळेत सिसीटीव्ही कॅमेरे (School CCTV) लावून इतर शाळांना एक आदर्श निर्माण करुन दिला आहे.यासाठी एकूण 20250/खर्च आला. या मध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षक मनिष हलामी व गावकरी लोकांनी वर्गणी करून शाळेला मोलाचे सहकार्य लाभले. मागील वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत सहभागी होऊन तालुक्यात मकेंँकसा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा, प्राथमिक गटाचा प्रथम क्रमांक मिळविला होता.