चिखली (Buldhana) :- बदलापूर घटनेवरून राज्यभरात उमटलेल्या तीव्र पडसादा नंतर राज्य शासनाने (State Govt) एक शासन निर्णय जारी केला. त्यामुळे अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी परीसरातील शाळा कॉलेज (School College)मध्ये जावून शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पोषण आहार शिजविणाऱ्या महिला पुरुष यांच्या भेटी घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांनी करावयाच्या उपायोजनांबाबत सविस्तर माहिती दिली .
ठाणेदारांनी दिल्या शाळांना भेटी
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कै.लक्ष्मीबाई आश्रम शाळा शिवणी अरमाळ,जिल्हा परिषद शाळा शिवणी अरमाळ, जिल्हा परिषद शाळा बायगाव,श्री शिवाजी हायस्कूल मेरा बु जिल्हा परिषद शाळा मेरा बु, जिल्हा परिषद शाळा अंत्री खेडेकर इ.येथील शाळांना बदलापूर मुंबई येथे घडलेल्या घटनेच्या संबंधाने भेट देण्यात आली. सदर भेटीदरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व यांना सूचना देऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावून चांगल्या स्थितीत ठेवणे बाबत तसेच मुलींच्या सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेणे बाबत सूचित करण्यात आले. शाळेमध्ये असलेला शिक्षकेतर स्टाफ, तसेच काही कामानिमित्त नियमित येणारे बाहेरील लोकांची चरित्र पडताळणी करून घेणे बाबत सूचना दिल्या. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींना जागृती बाबत मार्गदर्शन करण्यात आले. निर्गमित केलेल्या जी आर प्रमाणे कारवाई करण्याची देखील सूचना देण्यात आल्या.