शाळा शोधून देण्याची शिक्षण विभागाला विनंती
परभणी (RTE Admission) : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आरटीई) (RTE Admission) अन्वये शहरातील शाळेत नंबर लागला मात्र प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांसहीत पालक गेले असता दिलेल्या पत्त्यावर शाळाच आढळून आली नाही. त्यामुळे पालकांनी शुक्रवार २६ जुलै रोजी शिक्षण विभागातले तक्रार करत शाळा शोधून देण्याची मागणी केली आहे.
अन्यथा आंदोलनचा मनसेचा इशारा
माहितीनुसार. शहरातील मोहित शहाणे या विद्यार्थ्याचा (RTE Admission) आरटीई २५ टक्के अंतर्गत ऑनलाईन पध्दतीने शहरातीलच अनम इंग्लिश प्राथमिक शाळा, कुरबान अलिशाह नगर दर्गा रोड या शाळेत नंबर लागला. यावेळी पालक अजय शहाणे आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी सदरील शाळेत गेले असता या नावाची शाळा शहरात कुठेही भरलेली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या हलगर्जीपणास शिक्षणाधिकारी व संबंधीत प्रक्रियेतील अधिकारी जबाबदार असून त्यामुळे पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा शोधून द्यावी व पाल्याला मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकारी मिळवून द्यावा, तसेच संबंधीत शाळा येत्या दोन दिवसात शोधून न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, जिल्हाध्यक्ष मनसेचे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख, सुर्यकांत मोगल, प्रशांत टाक, भारत पवार आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
शिक्षणाधिकार्यांचा नो रिस्पॉन्स
या विषयी शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनिल पोलास यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर उपशिक्षणाधिकारी यांनी आम्ही उपोषणस्थळी असल्याने थोड्याच वेळात संपर्क करणार असल्याचे सांगितले.