ऑनलाईन देयकांसाठी मुदतवाढ द्यावी, डॉ. एस. के. शिंदे यांची मागणी
देवळाली (School website shutdown) : महाराष्ट्र शासनाची शालार्थ वेबसाईड काही तांत्रिक कारणांमुळे सातत्याने बंद पडत आहे. (School website) शासनाने शिक्षक आणी शिक्षकेत्तर सेवकांची ऑनलाईन थकीत देयके सादर करण्याची अंतिम मुदत २० सप्टेंबर पर्यंत दिली आहे. मागील आठवड्यात सलग तिन दिवस सुटटी असूनही संबधित सेवकांनी शाळा, महाविद्यालयात हजेरी लावली. पण शालार्थची वेबसाईड बंदच होती. या आठवडयात परिस्थिती पुन्हा जैसे थे आहे. यामुळे थकीत देय बिलांची ऑनलाईन कामे खोळंबल्याचे दिसून येत आहे.
शासनाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या माध्यमिक विभागाने दिनांक १२ सप्टेंबर रोजी अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, मनपा व सैनिकी शाळा, अध्यापन विद्यालये, सराव पाठशाळा, जिल्हा नाशिक मुख्यादयापक व प्राचार्य यांच्या नावाने एक परित्रक काढले. परिपत्रकात थकीत पूरवणी बिल देयके दिनांक १८ सप्टेंबर २०२४ पर्यंत शालार्थ प्रणालीवर ऑनलाईन (School website) सादर करणे आवश्यक असल्याचा म्हटले होते. त्यामुळे संबधित सेवकांनी रविवार व रमजान ईदची सुटटी असून देखील कार्यालयात हजेरी लावली. शालार्थची ऑनलाईन वेबसाईड बंद पडल्याने थकीत देयकांचे ऑनलाईन पध्दतीचे कामे खोळंबली.
एकीकडे १८ सप्टेंबरची शेवटची मुदत तर दूसरीकडे बंद पडलेली शालार्थ वेबसाईड यामुळे ठराविक मुदतीत कामे होतील की नाही, असा प्रश्न देयकांची कामे करणारे सेवक आणि थकीत देयके धारक असणा-या शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवकांपुढे निर्माण होतांना दिसत होता. पण शासनाने (School website) शालार्थ साईटची तांत्रिक अडचण लक्ष्यात घेत २० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली. परंतू वेबसाईटची समस्या जैसे थे असल्याने थकीत ऑनलाईन दैनिके फॉरवड होऊ शकली नाही. त्यामुळे संबंधित विभागाने वेबसाईट सुरळीत करून थकीत देयकांसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जाते आहे.
वेबसाईट सुरळीत करुण मुदतवाढ द्यावी : डॉ. एस. के. शिंदे, अध्यक्ष (महाराष्ट्र राज्य कनिष्ट महाविद्यालयीन संघ)
रविवार, सोमवार आणि मंगळवार अशी सलग तिन दिवस जोडून सुटटी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना होती. सुटटी असतांनाही कार्यालयात हजर राहून ऑनलाईन देयकाची कामे संबधित सेवकांकडून केली जात होती. पण शालार्थ वेवसाईडच बंद पडल्याने (School website) ऑनलाईन कामे कशी करणार असा प्रश्न या सेवकांपुढे निर्माण होत आहे. या समस्याविषयी दाद कुणाकडे मागावी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे. शासनाने एक तर बंद असणारी शालार्थ वेबसाईड तातडीने सुरु करावी, अन्यथा थकीत वेतन देयके सादर करण्याच्या कामकाजासाठी पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ट महाविद्यालयीन संघाचे अध्यक्ष डॉ. एस. के. शिंदे यांनी केली आहे.