४३ व्या स्काऊट आणि गाईड मेळाव्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
परभणी (Scout Guide) : भारत स्काऊट आणि गाईड परभणी जिल्हा कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि नवरचना प्रतिष्ठान आयोजित ४३ व्या स्काऊट, गाईड (Scout Guide) जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन मंगळवार १४ जानेवारी रोजी मनपा आयुक्त धैर्यशिल जाधव यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी आशा गरुड यांची उपस्थिती होती. तसेच शिक्षणाधिकारी सुनिल पोलास, संजय ससाणे, प्राचार्य प्रल्हाद मोरे, प्राचार्या सौ.गंगासागर मोरे, महाराष्ट्र राज्य शिक्षण सेना विभागीय अध्यक्ष बाळासाहेब राखे, तुषार गोळेगावकर, सुनिल जाधव केरवाडीकर, डॉ. शिवराज नाईक, संदिप माटेगावकर, गजानन वाघमारे, मंगेश नरवाडे, मुकेश राठोड, शौकत पठाण, संजय आदोडे, व्ही. पी. बुधवंत, जया जाधव, शेख, किशोर नागरे, डॉ.अनिल सिंह ठाकूर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात प्राचार्य प्रल्हाद मोरे, प्राचार्या गंगासागर मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
आभार विद्या लटपटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी तुषार तरटे, दत्ता अडगुलवार, हनुमान शिंदे, अक्षय कर्हाळे, वैभव देशमुख, परमेश्वर गिरे, व्ही. राठोड, बद्री माळोदे, सुधाकर दुधाटे, पौर्णिमा जोंधळे, राजेश्री वाघ, सारीका पतंगे, स्वाती देशमख, अश्विनी अंभोरे, संगिता पांचाळ, वेदांत आरसेवाड, दृष्टांत मुलगीर, वैभव कांबळे, एकनाथ मोरे, ऋषिकेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले.