पुणे (Pune) :- पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील उजनी जलाशयात बुडालेल्या सहाही जणांचे मृतदेह (Deadbody) एनडीआरएफच्या पथकाने गुरुवारी सकाळी बाहेर काढले. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी (Autopsy) इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात(Government hospitals) पाठवले आहेत.
मुसळधार पावसामुळे भीमा नदीत बोट उलटली
मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे भीमा नदीत(Bhima river) बोट उलटली होती. त्यावेळी बोटीत सात जण होते. यापैकी एक पोलिस पोहून किनाऱ्यावर आला होता, तर मंगळवारी संध्याकाळपासून एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक सहा जणांचा शोध घेत होते. तब्बल 36 तासांच्या शोध मोहिमेदरम्यान आज बेपत्ता झालेल्या सहाही जणांचे मृतदेह उजनी जलाशयात सापडले. एनडीआरएफच्या(NDRF) पथकाने हे मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. भीमा नदीत बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. गोकुळ दत्तात्रय जाधव (वय 30 वर्षे), कोमल दत्तात्रय जाधव (वय 25 वर्षे), शुभम गोकुळ जाधव (वय 1.5 वर्षे), माही गोकुळ जाधव (वय 3 वर्षे), अनुराग ढिकये (वय 35 वर्षे) आणि गौरव अशी त्यांची नावे आहेत.