कार्यालयीन कामात अडथळा व अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पाथरी पोलिसात गुन्हा दाखल
परभणी/पाथरी (Former MLA Durrani) : माजी आमदार बाबाजानी दुर्राणी (Former MLA Durrani) यांच्यावर पाच दिवसाच्या फरकाने पाथरी पोलीस ठाण्यामध्ये दुसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली असून यावेळी नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्याला मारहाण व अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यासह इतर सात जणांवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचवेळी घडलेल्या दुसऱ्या घटनेत दुर्राणी यांच्या चार समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथरीत राजकीय वातावरण तापलेले
सोमवारी सकाळी १० वा सुमारास माजी आमदार दुर्राणी (Former MLA Durrani) व त्यांचे काही समर्थक नगरपालिका इमारतींमध्ये दाखल झाले होते . यावेळी त्यांनी आंदोलन करण्यासाठी गाढव सोबत आणली होती. पोलिसांनी आंदोलन व निवेदन दिल्या जाणार असल्याची माहिती असल्याने नगरपालिका परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त लावला होता. दरम्यान नगरपालिकेची सीईओ कदम यावेळी हजर नव्हते. माजी आमदार दुर्राणी यांनी श्री साईबाबा विकास आराखड्या संदर्भात नगरपालिकेत काम करणारे दिवाण यांच्या कार्यालयीन कक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी त्यांचा सहाय्यक असणाऱ्या कर्मचारी सदाशिव गायकवाड याच्याशी वाद झाला.
गुन्हा दाखल करण्यासाठी सईद खान यांच्यासह जमावाचा पाथरी पोलीस ठाण्यामध्ये जमाव
यानंतर सुमारे दोन तास माजी आमदार दुर्राणी (Former MLA Durrani) नगरपालिकेमध्ये बसून होते. दरम्यान कर्मचारी सदाशिव गायकवाड याला मारहाण झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शिवसेना शिंदे गटाचे सईद खान यांच्यासह मोठा जमाव पाथरी पोलीस ठाण्यामध्ये दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दाखल झाला होता. यावेळी पोलीस ठाण्यामध्ये वातावरण तणावपूर्ण बनले होते दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेण्यात आली होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी ही पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. निर्माण झालेली परिस्थिती सांभाळण्यात पोनि. महेश लांडगे व त्यांची टिम यशस्वी झाली असली तरी, पाथरीत राजकीय गरमागरमी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शहरात पुन्हा तणावपूर्ण शांतता
साई मंदीर विकास आराखडा समीती (नगर पालीका दिवाण यांचे सहायक) सदाशिव आण्णासाहेब गायकवाड यांनी पाथरी पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून कार्यलयात शासकीय काम करत असताना मारहाण व अश्लिल शिवीगाळ केल्या प्रकरणी माजी आमदार अब्दुला खान लतीफ खान दुर्रानी (Former MLA Durrani) यांच्यासह शहजाद बक्तीयार खान, शेख इरफान शेख रज्जाक, रेहान मगबुल खान दुर्राणी, हमीद खान शेर खान, शेख नशीर शे रौफ, अब्दुन इब्राहीम अब्दुल रशीद अन्सारी, शेख अलताफ शेख मुल्लाक सर्व रा. पाथरी यांच्यावर पाथरी पोलिसात विविध कलमाखाली गुन्हा नोंद झाला आहे.
या दरम्यान घडलेल्या एका दुसऱ्या घटनेमध्ये मोहम्मद युनुस मोहम्मद नुर कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दगडफेक व मारहाण केल्या प्रकरणी माजी आमदार दुर्राणी (Former MLA Durrani) यांच्या चार समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.