लातूर (Deshikendra recruitment case) : एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या देशिकेंद्र विद्यालयात झालेल्या बेकायदा नोकर भरती प्रकरणात सुनावणीस हजर राहा, असा आदेश लातूरच्या शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी दिल्यानंतर या प्रकरणी तात्काळ पत्र लिहीत महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी सुनावणीसाठी हजर राहण्यास आठ दिवसांची मुदत मागितली आहे. या (Deshikendra recruitment case) प्रकरणात आपणास काही कागदपत्रे दाखल करावयाची असल्याने सदरील सुनावणी आठ दिवसांनी ठेवण्यात यावी, असे पत्र सचिवांनी शिक्षण उपसंचालकांना दिले आहे. त्यामुळे 1 एप्रिलला होणारी ही सुनावणी आता 9 एप्रिलला होणार आहे.
मुळातच तक्रारदाराने याप्रकरणी तक्रार केल्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी (Deshikendra recruitment case) याप्रकरणी सुनावणीसाठी आदेश काढण्यास तब्बल महिनाभराचा वेळ घेतला. महिनाभरानंतर या सुनावणीसाठी एक एप्रिल चा मुहूर्त ठरला. याबाबत लातूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह या प्रकरणातील सर्व संबंधितांना पत्रही देण्यात आले. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, या प्रकरणातील कधीच मुख्याध्यापिका एस. के. कल्याणी, सेवक स्नेहलकुमार खुडे व सर्व संबंधितांना सुनावणीसाठी आदेश काढले असतानाच 31 मार्च रोजी लातूरच्या महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी शिक्षणउपसंचालकांना पत्र लिहीत या (Deshikendra recruitment case) प्रकरणात सुनावणीसाठी आठ दिवसांची मुदत वाढवून मागितली. आपण बाहेरगावी जात असल्याने तसेच या प्रकरणात काही कागदपत्रे सादर करावयाचे असल्याने आपणास आठ दिवस वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती टाकळीकर यांनी केली. या विनंतीवरून या प्रकरणाची सुनावणी आता 9 एप्रिल रोजी ठेवावी, असा शेरा शिक्षण उपसंचालकांनी मारला आहे.
सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी विठ्ठल महापुराव भोसले यांनी शिक्षण उपसंचालकांसह सर्व संबंधितांना पत्र देत देशिकेंद्र विद्यालयात स्नेहलकुमार नामदेवराव खुडे हे शिपाईपदी नियुक्तीला हरकत घेतली आहे. ही (Deshikendra recruitment case) भरती बेकायदा असून नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी भोसले यांनी पत्रात केली. त्यावरून उपसंचालकांनी या प्रकरणाची सुनावणी ठेवली आहे.