लाहोर (Lahore): पाकिस्तान संघ (Pakistan team) सतत अडचणींचा सामना करत आहे. प्रथम T20 विश्वचषक स्पर्धेत ( T20 World Cup) अमेरिका आणि भारताकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी संपूर्ण संघाला फटकारले. पावसाच्या भीतीने संघाला स्पर्धेतून बाहेर जाण्याची चिंता सतावत होती. मात्र बाबर आझमच्या संघावर नवीनच संकट कोसळले आहे. संपूर्ण टीम तुरुंगात जाण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानच्या वकिलाने प्रशिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांसह सर्व खेळाडूंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. वकिलाने संपूर्ण टीमवर देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.
पाकिस्तान संघावर बंदीची मागणी
पाकिस्तानमधील गुजरांवाला शहरातील एका वकिलाने बाबर आझम आणि इतर खेळाडूंविरोधात देशद्रोहाची याचिका दाखल केली आहे. त्यात संघाचे खेळाडू (Pakistan team) आणि प्रशिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नावांचाही समावेश आहे. वकिलाने संपूर्ण टीमवर अनेक गंभीर आरोप (serious charges) केले आहेत. पाकिस्तान माहितीनुसार, वकिलाने याचिकेत म्हटले आहे की, अमेरिका आणि भारताविरुद्धच्या पराभवामुळे मला खूप दुख झाले आहे. वकिलाने कर्णधार बाबर आझमच्या संघावर देशाची प्रतिष्ठा पणाला लावून फसवणूक करून पैसे कमावल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याची मागणी वकिलाने केली असून ते पूर्ण होईपर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघावर (Pakistan Cricket Team) बंदी घालण्यास सांगितले आहे. अहवालानुसार, ही याचिकाही मंजूर करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघावर आता तुरुंगात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अमेरिका आणि भारताकडून पराभव पत्करावा लागला
पाकिस्तानने (Pakistan team) अमेरिकेविरुद्ध टी-20 विश्वचषकाची (T20 World Cup) सुरुवात केली. बाबर आझमच्या संघाला सलामीच्या सामन्यातच पराभवाला सामोरे जावे लागले होते. टेक्सासमधील डलास स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे अमेरिकेने 159 धावा करत बरोबरीत सोडवले. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव केला. न्यूयॉर्कमध्ये (New York) झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. तेव्हापासून माजी क्रिकेटपटूंसह अनेक पाकिस्तानी चाहते त्यांच्या संघावर प्रचंड नाराज आहेत.