हिंगोली (AKhada Python) : तालुक्यातील पेडगाव शिवारात पांडुरंग वायफळे यांच्या शेत गट नं. ३२० मधील शेतातील आखाड्यावर अजगर जातीचा साप निघताच अनेकांची बोबडी वळली. हा (AKhada Python) अजगर मागील काही दिवसापासून याच परिसरात काही शेतकर्यांना दिसून आला होता.
याची माहिती सर्पमित्र पटवेकर यांना देताच त्यांनी तात्काळ आखाड्यावर धाव घेऊन (AKhada Python) अजगर जातीच्या सापाला पकडले. त्यानंतर वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली या अजगराला जंगलात सोडून दिले.




