Nanded :- विधान परिषदेच्या (Legislative Council) निवडणुकीत क्रॉस वोटिंग(Cross voting) केल्याचा आरोप काँग्रेसपक्षाचे देगलूर – बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांच्यावर करण्यात आला होता. याबाबत त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चक्क तेथून पळ काढला.
नांदेडचे पालकमंत्री(Guardian Minister) गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज नांदेड मध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार जितेश अंतापूरकर हे उपस्थित होते. अंतापूरकर यांनी काही दिवसा पूर्वी भाजप नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते भाजप (BJP)मध्ये जाणार अशी चर्चा देखील सुरू होती. माझ्यावर बिनबुड्याचे आरोप करण्यात आले आहे, योग्य वेळी बोलणार सध्या मी काँग्रेस(Congress) मध्ये असल्याचे आमदार जितेश आंतापूरक त्यांनी सांगितले.