वलांडी (Latur):- उदगीर तालुक्यातील उदगीर बिदर रोडवर मोघा शिवारातील रायडर क्लब मोघा येथे धाड टाकुन आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून एकूण २ कोटी १३ लाख ७५ हजार २३० रूपयांचा मूद्देमाल जप्त करण्यात आला.
एकूण २ कोटी १३ लाख ७५ हजार २३० रूपयांचा मूद्देमाल जप्त
8 नोव्हेंबरला पोलीस (Police)प्रशासनाला माहिती मिळाली त्याप्रमाणे वेळ न दवडता पोलिसांनी उदगीर-बिदर रोडवरील रायडर क्लबवर धाड टाकली. नियमांचा भंग करून तिरट जुगार पैशावर खेळत व खेळवित असताना ५० आरोपी मिळून आले. यावेळी रोख रक्कम ३ लाख ३५ हजार ७५० रूपये व सोबतच आरोपींचे मोबाईल (mobile)अंदाजे किंमत ४ लाख ३९ हजार ५०० रूपये व सोबत वापरलेली चारचाकी वाहने अंदाजे किंमत २ कोटी ६ लाख रूपये असे एकूण २ कोटी १३ लाख ७५ हजार २३० रूपये मूद्देमाल जप्त करण्यात आला. दि १० ऑक्टोबर रोजी ५.५० वाजता विष्णू गोपीनाथराव गूंडरे पोह. संलग्न उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांच्या फिर्यादीवरून ५० व्यक्ती विरोधात गुरनं ३६०/२४ कलम २२३,११२ बीएनएस १२(अ) ४.५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नूसार गून्हा (Crime)नोंद करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौंड हे करीत आहेत.