हिंगोली (Revenue department) : महसूल विभागाच्या विभागीय स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन 14 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले असून त्यानुसार 17 फेब्रुवारीला होणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धेची शुक्रवारी येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात कलावंतांची निवड केली जाणार आहे. यातून उत्कृष्ट ठरलेले कलावंत विभागीय स्पर्धेत पात्र ठरणार आहेत.
दरवर्षी प्रमाणे यंदाही (Revenue department) महसूल विभागाच्या वतीने क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता सांस्कृतिक स्पर्धेची निवड चाचणी होणार आहे. यामध्ये जिल्हाधिकारी अभिनव गोयल, यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, अभिमन्यू बोधवड, कार्यक्रमांची जोरदार तयारी सुरु केली आहे. जालना येथे होणाऱ्या विभागीय महसूल स्पर्धेत हिंगोली महसूल संघाची कामगिरी अवस्मरणीय ठरेल असे वाटते. ही निवड चाचणी कै.शिवाजीराव देशमुख सभागृहात होणार असून या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन (Revenue department) महसूल संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.




