पाच वर्षांपर्यत मिळणारं योजनेचा लाभ
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलडाणा (Pokhara Yojana) : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ या पोखरा योजनेमध्ये (Pokhara Yojana) चिखली तालुक्यातील ३६ गावांना मान्यता देण्यात आली आहे . महाराष्ट्र सरकार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,शासन निर्णय क्रमांक १४ ऑक्टोबर, २०२४ मध्ये नमूद करण्यात आले आहे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे राज्याच्या इतर जिल्ह्यांमधील गावांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्याची मागणी विचारात घेऊन दिनांक २८ जून, २०२३ रोजीच्या मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार दिनांक ३० जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पामध्ये सद्यः स्थितीत समाविष्ट असलेल्या एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित रु.६००० कोटी (रुपये सहा हजार कोटी) किंमतीच्या जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यास शासनाची तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्यें चिखली तालुक्यातील डोगर शेवली , शेलसूर , करवंड ,वैरागड, मोहादरी , खामखेड , गोंधनखेड , सावरखेड नजिक , टाकरखेड (मु ) एनखेड , अमडापूर,शेलोडी, करनखेड, अन्वी ,पळसखेड सपकाळ, धोडप , शेलुद , पेठ , बोरगाववसु शिदी हराळी , गोदरी , किन्होळा , ब्रम्हपुरी, भोगावती , तांबुळवाडी , पळसखेड दौलत , चांदई , पाबुळवाडी , मातखेड, जांभोरा , असोला बु , गुंजाळा अशा एकूण ३६ गावाची पोखरा या योजनेत निवड झाली असल्याने या गावातील शेतकऱ्यांना फार मोठा लाभ सतत पाच वर्ष मिळणार आहे.