कोरपना तालुक्यातील या शाळेच्या विद्यार्थ्याला मिळणार दिल्लीत पुरस्कार
देशोन्नती वृत्तसंकलन
कोरपना (Virgatha Shaurya Award) : भारत सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी २०२० अंतर्गत विरगाथा भारताच्या शौर्य पुरस्कार (Virgatha Shaurya Award) विजेतांच्या प्रेरणादायी कहाण्यामधून प्रोत्साहन देण्यासाठी सिबिएसई आणि संरक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या स्पर्धामध्ये सिबिएसई स्तरावर कोरपना तालुक्यातील आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवालपूर शाळेने विरगाथा ४.० अंतर्गत आयोजीत स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला होता
यात कविता लेखन मध्ये कु. अथर्व देविदास मोहुर्ले इयत्ता ११ (सायन्स शाखा )या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता त्यात अथर्वची कविता सिबिएससी स्तरावर पुढील मूल्यांकणासाठी निवडल्या गेली असून प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय स्तरावरून दिल्ली येथे प्रतिष्ठित कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली असून देशाचे पंतप्रधान यांचे हस्ते (Virgatha Shaurya Award) राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक दिले जाणार आहेत यामुळे आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल शाळेच्या मुख्याध्यापक सह शिक्षकांकडून अथर्वचे कौतुक केल्या जातं आहेत शाळेतील मित्र मंडळी कडून भरभरून शुभेच्छा दिल्या असून अथर्वच्या परिवार व नातवंडात आनंद व्यक्त केल्या जात आहेत.