परभणी/ सोनपेठ (Orchard Yojana) : तालुक्यातील ६० गावातील ८६ शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडी अंतर्गत फळबाग लागवडीसाठी अर्ज दाखल करण्यात आले होते.त्यापैकी ४८ शेतकऱ्यांची लक्की ड्रा पध्दतीने निवड करण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत (Orchard Yojana) फळबाग योजना राबविण्यात येत आहे. अशा शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत फळबागेसाठी अर्ज सादर करता येतात.
यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र आहे, जॉब कार्ड नसलेले शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत लाभ मिळतो. या (Orchard Yojana) योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करावे लागतात. यामध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी ५०टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के व तिसऱ्या वर्षी २०टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत तालुक्यातील ४२ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ६० गावांमध्ये ८६ अर्ज प्राप्त झाले होते. च्या मधून लकी ड्रॉ मार्फत ४८ शेतकऱ्यांची निवड झाली असून या लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे. कै. भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्या शेतकऱ्यांनी उत्तम दर्जाची फळझाडे खरेदी करून फळबागेची लागवड केली आहे.
कै भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत लाभार्थींना (Orchard Yojana) फाळबागेची करता येणार लागवड या योजनेर्तगत आंबा, डाळिंब, बोर, सीताफळ, पेरू, कागदी लिंबू, लिंबू, मोसंबी, संत्रा, आवळा, चिकू, चिंच, व जांभूळ या विविध प्रकारच्या वृक्षांची या योजनेअंतर्गत लागवड करता येते.फुल शेती हि करता येणार.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गुलाब, मोगरा व निशिगंधा या फुलशेतीसाठी ही अनुदान मिळणार असल्याने वृक्षलागवड योजनेअंतर्गत ही करता येणार आहे.बांधावर ही करता येणार वृक्षांची लागवड.कृषी कार्यालयाच्या वतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधावर ही वृक्षाची लागवड करून त्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये आंबा, नारळ, चिंच, कवट, जांभूळ व सीताफळ या वृक्षांचा समावेश आहे.
कै.भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे. त्या शेतकऱ्यांनी उत्तम दर्जाची फळझाडे खरेदी करून (Orchard Yojana) फळबागेची लागवड करावी.
– गणेश कोरेवाड *तालुका कृषी अधिकारी