सेलूच्या -देवगाव फाटा रस्त्यावर चोरलींब परिसरात घडली घटना
परभणी/सेलू (Selu Accident) : देवगाव फाटा रस्त्यावर चिकलठाणा पाटीजवळ असलेल्या चोरलींब येथे भरधाव आयशरला दुसरीची धडक बसून झालेल्या अपघातात (Selu Accident) दुचाकी चालकाच्या पायाला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज गुरुवार दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू -देवगाव फाटा रस्त्यावर चिकलठाणा परिसरात असलेल्या चोरलींब येथे भरधाव वेगात देवगाव फाट्यावरून सेलू कडे येणाऱ्या आयशने सेलुहुन मंठा कडे दुचाकी वरूनजाणाऱ्या उद्धव सोनाजी उन्हाळे राहणार इरळद तालुका मानवत यांच्या दुचाकीला धडक दिली.
या (Selu Accident) अपघातात उद्धव उन्हाळे याच्या पायास जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.त्यास सेलू उपजिल्हा रुग्णालयात (Selu Upazila Hospital) दुपारी एक वाजता दाखल करण्यात आल्यानंतर डॉ. बेबी गिरी यांनी उपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ परभणी येथे रेफर करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोलीस हवालदार वशिष्ठ भिसे, पोलीस नायक माधव कांगणे यांनी भेट देऊन (Selu Accident) अपघातग्रस्त आयशर आणि दुचाकी ही दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे. अद्यापही या अपघाता संदर्भात पोलीसात तक्रार दाखल झाली नसल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.