सेलू तालुक्यातील टाकळी किटे फाट्यावरील घटना
सेलू/वर्धा (Selu Accident) : वर्धा वरून येणारी कार व टाकळी किटे वरून सेलू रोड नी येणारी चार चाकी वाहणाची टाकळी फाट्याजवळ समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही वाहणातील दोन लोक किरकोळ जखमी झाले जखमी मध्ये छोट्या मुलगी असून वाहणाचे मोठे नुकसान झाले आहे. वर्धा येथील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते विकास दाडगे हे आपल्या कारणे वर्धेवरून हंदापुर मार्गाने जात होते. तर राळेगाव येथील कार हे शेलु रस्त्याने जात असताना टाकळी फाटा जवळ समोर धडकल्याने राळेगाव येथील कार एम एच 29 बी वी 2455 याला जबर धडक लागल्याने ही (Selu Accident) कार रस्त्याच्या बाजूला जाऊन काही मध्ये गेली. यामध्ये छोट्या मुलीसह दोन व्यक्ती बसले होते छोट्या मुलींना मार असून दोघे पती-पत्नी सुखरूप आहे.
टाकळी फाट्या वरील अपघात (Selu Accident) हे नेहमीचे असून तेथे ब्रेकरची मागणी असताना समधित विभाग डोळेजाक करीत आहे. सोबत दोन्ही बाजूला मोठे झाडें असल्याकारणाने येणारे वाहने दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले ब्रेकर बसवून झाड्याची छाटणी करावी, अशी मागणी नागरिकांन कडून करण्यात येत आहे