परभणीतील सेलु -पाथरी रस्त्यावर मंजीत जिनिंग परिसरात घडली घटना
परभणी/सेलू (Selu Accident) : शहरातील पाथरी रस्त्यावर मंजीत जिनिंग परिसरात भरधाव दोन दुचकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीस शहरातील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले आहे. (Selu Accident) ही घटना गुरुवार १६ जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील बंधन बँकेतील कर्मचारी कृष्णा रामेश्वर बचाटे वय २७ वर्षे राहणार पाटोदा ता. परतुर हा आपल्या दुचाकीवरून बँकेचे कलेक्शन करण्यासाठी (Selu Accident) सेलु वरुन पाथरी रस्त्याने जात होता. तर याच रस्त्याने मंजीत जिनिंग मधील मजुरी करणारा राजू दशरथे वय २८ वर्षे राहणार फुले नगर आपल्या दुचाकीवरून सेलूकडे येत असताना गुरुवार १६ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता या भरधाव दोन्ही दुचाकीत समोरासमोर झालेल्या धडकेत कृष्णा रामेश्वर बचाटे यांचे जागीच निधन झाले तर राजू दशरथे गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती कळतात सपोनि. संजय चव्हाण, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर, पोलीस कर्मचारी सुरेश पुलाते, के. आर. मुलगीर यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत, जखमीस सेलु उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या (Selu Accident) अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान मयत कृष्णा बचाटे यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.