सेलू बसस्थानकावरील गाड्यांची माहिती देणारे ध्वनीक्षेपक सुरू करण्याची मागणी
परभणी/सेलू (Selu Bus Stand) : शहरातील बसस्थानकावरील गाड्यांची माहिती देणारे ध्वनिक्षेपक मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. दुरुस्तीसाठी पाठवून दिलेले हे ध्वनिक्षेपक परत आलेच नाही. यामुळे (Selu Bus Stand) वयस्कर लोक, महिला, बसने येजा करणारे शाळेतील विद्यार्थी, तसेच ज्यांना वाचता येत नाही. अशांना अनेक अडचणी येत आहेत. सेलू हे मोठे शहर असून बसस्थानक की भव्य आहे. पण साधे ध्वनिक्षेपक येथे उपलब्ध नाही. बसस्थानकाचे बांधकाम करून हस्तांतर झाल्यानंतर बसस्थानकात विविध प्रकारच्या झालेल्या गैरसोईकडे संबंधितांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
ध्वनीक्षेपणाबरोबरच आसन व्यवस्थेची देखील मोठी समस्या आहे. बसस्थानक आणि बसस्थानकाच्या परिसरातील घाण हीच या (Selu Bus Stand) बसस्थानकाची ओळख होऊन बसली आहे. बसस्थानकाच्या पूर्वेस दोन्ही बाजूने लोक सर्रासपणे लघुशंकेला बसतात . त्या रस्त्यावरूनच महिला प्रवाशांना मान खाली घालून जावे लागते. बस स्थानक समोर उभे असलेले हात गाडीवाले देखील आपली सर्व घाण या परिसरात बिनधास्तपणे फेकतात. परंतु याकडे बसस्थानकाच्या संबंधिताप्रमाणेच सर्वच जण दुर्लक्ष करत आहेत. याबाबी अत्यंत महत्त्वाच्या असून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे बसस्थानकाची भव्य वास्तू हि शोभेची वस्तू बणली आहे.
यासह इतर सुविधा १५ दिवसात करण्यात यावी नसता (Selu Bus Stand) सेलू बसस्थानकामध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा बुधवार १८ सप्टेंबर रोजी सेलु बसस्थानकावरील वाहतूक प्रमुख संजय पवार यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर जयसिंग शेळके, शिवम गटकळ, त्र्यंबक पितळे, संजू सोळंके, वैभव आवटे, किशन खनपटे ,दत्ता गात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.