परभणीच्या सेलुत हॉटेल गुरुकृपा येथे घडली घटना
सेलू (Selu Crime) : शहरातील पाथरी रस्त्यावर असलेल्या हॉटेल गुरुकृपा येथे दारूची बॉटल फेकून का मारली (Selu Crime) याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या तरुणास शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना शनिवार १ जून रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी (Selu Police) पोलीसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर रविवार २ जून रोजी मध्यरात्रीनंतर ३ वाजता हॉटेल गुरुकृपाच्या मालकासह इतर दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूची बाटली फेकून मारल्याची विचारणा करताच मारहाण
याबाबत (Selu Police) पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील पाथरी रस्त्यावर हॉटेल गुरुकृपा शेजारी असलेल्या वाटिका हॉटेल मध्ये जेवणासाठी बसलेल्या धीरज दतराव रोडगे वय ३१ वर्षे राहणार रवळगाव तालुका सेलू हे आपल्या सहका-यासह बसले होते. यावेळी शेजारी असलेल्या शुद्ध शाकाहारी गुरुकृपा हॉटेलच्या मधून कोणीतरी दारूची बाटली फेकून मारली उभयतांना बाटली लागल्यामुळे याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या धीरज रोडगे व सहकारी यास सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर हॉटेल गुरुकृपा बाहेर येताच मुकेश बगानी याने अश्लील भाषेत शिवीगाळ करत फिर्यादी व साक्षीदारास हातातील लोखंडी रॉडने कपाळावर मारुन जखमी केले तर बाबासाहेब लोखंडे याने हातातील कवचा डोक्यात मारला. ही (Selu Crime) भांडणे सोडणाऱ्या साक्षीदारास अमन बगानी याने हातातील लांच्या मारून जखमी केले तर रेवा बगानी यांनी हातातील मोठ्या बांबूने पाठीत मारून दुखापत केली.
चार जणांसह इतरावर गुन्हा दाखल
यावेळी रेवा बगानी यांने बोलविलेल्या अनोळखी आठ-दहा जणांनी थापड बुक्क्यांनी मारहाण केली. या (Selu Crime) गोंधळात धीरज रोडगे व त्याचा साक्षीदार पळत असताना पाठीमागून विटा फेकून मारल्याप्रकरणी धीरज दत्तराव रोडगे वय३१वर्षे राहणार रवळगाव तालुका सेलू यांने दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं ३०९/२०२४ कलम ३२४, ३३६, २९४, ३२३, १४३, १४७, १४९, ५०४भादवि सहकार्य १३५ अन्वये आरोपी बाबासाहेब लोखंडे, रेवा बगानी, मुकेश बगानी,अमन बगानी सह इतर आठ ते दहा जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान या (Selu Police) प्रकरणी पोलीसांनी हॉटेल गुरुकृपा येथे दारूची चौकशीसाठी जाऊन त्यांच्या सिसि टीव्ही घटनेचे फुटेज जाणून घेण्यासाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.