परभणीच्या सेलू तालुक्यातील वालूर येथे घटना उघडकीस
परभणी/सेलू (Selu Crime) : एका सात महिन्याच्या स्त्री जातीच्या अर्भकाला (Female infant) विहिरीत टाकण्यात आल्याची घटना सेलू तालुक्यातील वालूर येथे गुरूवार २७ जून रोजी दुपारी २ च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञातावर (Selu Police) सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल
लिंबाजी रामराव पिंपणवार यांनी तक्रार दिली आहे. वालूर येथील शेत सर्वे नं.२९६ मधील विहिरीत एका अज्ञात व्यक्तीने अंदाजे ७ महिन्याचे स्त्री जातीचे अर्भक (Female infant) अपत्य जन्माची लपवणूक करण्याच्या उद्देशाने मृत अवस्थेत विल्हेवाट न लावता, अंत्यविधी न करता टाकून दिले. (Selu Crime) विहीरीत अर्भक असल्याचे दिसल्यावर याची माहिती पोलीसांना दिली. सदर प्रकरणी अज्ञातावर (Selu Police) सेलू पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोनि. दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह.हिंगे तपास करत आहे.