विहीर खोदण्यासाठी केली तीन लाखाची मागणी
परभणी/सेलू (Selu Crime) : शहरातील राजीव गांधी नगर मध्ये राहत असलेल्या एका ३० वर्षीय विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या चार जणांवर (Selu Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे कुंभेफळ तालुका जिल्हा जालना हल्ली मुक्काम राजीव गांधी नगर येथे वास्तव्यास राहत असलेल्या संगीता परमेश्वर जाधव वय ३० वर्षे या विवाहितेस विहिरीचे खोदकाम करण्यासाठी सासरच्या कडून तीन लाख रुपयांची मागणी केली.
तसेच तुला कामधंदा येत नाही, सासरच्या लोकांशी नीट वागत नाही यासह इतर कारणांमुळे शिविगाळ करत उपाशी ठेवून विवाहितता संगीता जाधव हिचा छळ करण्यात येत होता २० मे २०१५ ते १५सप्टेंबर २०२४ दरम्यान विवाहितेच्या घरी कुंभेफळ तालुका जालना येथे छळ करण्यात येत असे त्याच कारणावरून विवाहिता संगीता जाधव हीस शारीरिक व मानसिक त्रास देत थापड बुक्क्यांनी मारहाण करत उपाशी ठेवून घराबाहेर हाकलून दिल्या प्रकरणी दिल्याप्रकरणी संगीता परमेश्वर जाधव हिने दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार भारतीय न्याय संहिता अन्वये ५ डिसेंबर रोजी परमेश्वर सुभाष जाधव, सुभाष सोनाजी जाधव, रामेश्वर सुभाष जाधव, ज्ञानेश्वर सुभाष जाधव राहणार सर्व कुंभेफळ तालुका जिल्हा जालना यांच्यावर (Selu Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत.