परभणीच्या सेलू तालुक्यातील घटना, आरोपींवर गुन्हा दाखल
परभणी/सेलू (Selu Crime) : शेतीच्या वादात एका ४० वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास सेलू तालुक्यात एका गावात घडली. विशेष म्हणजे या घटनेत पिडितेच्या जाऊच्या सुनेने आरोपींना मदत केली. दोघांनी मिळून महिलेवर अत्याचार केला. या (Selu Crime) प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडित चाळीस वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पतीचे निधन झाल्यानंतर भायासोबत शेतीचा वाद न्यायालयात चालू आहे. १७ ऑगस्टला शेतात पिडितेची जाऊ मुगाच्या शेंगा काढत होती. पिडितेने जाऊला थांबविल्यावर जाऊच्या सुनेने पिडितेसोबत वाद घातला. तिच्या केसाला धरुन घरात नेले. या ठिकाणी आधीपासूनच असलेल्या दोघांनी महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरुन एकूण तीन जणांवर सेलू पोलिसात (Selu Crime) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीची काढली छेड
नवा मोंढा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एका वसाहतील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आल्याचा प्रकार २० ऑगस्ट रोजी सकाळी घडला. या (Selu Crime) प्रकरणी पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारी वरुन ज्ञानेश्वर इंगोले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि तांबोळी करत आहेत.