चार जणावर गुन्हा दाखल
परभणी/सेलू (Selu Crime) : तालुक्यातील देऊळगाव गात येथे एका महिन्यापूर्वी झालेल्या घटनेचा वाद का घालतोस असे म्हणत एका १८ वर्षीय तरुणास गावातील बँक ऑफ महाराष्ट्र समोर १४मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बेदम मारहाण करण्यात आली असून, याप्रकरणी चार जणावर शनिवार १५ मार्च रोजी दुपारी दोन वाजता (Selu Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती, याप्रमाणे तालुक्यातील देऊळगाव गात येथे बँक ऑफ महाराष्ट्र समोर १५ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता नमूद आरोपीतांनी निवृत्ती सतीश शिलार वय १८ वर्षे यास महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा वाद का घालतोस या कारणावरून निवृत्ती शिलार यास अशोक नंदू चव्हाण याने अश्लील भाषेत शिविगाळ केली. हातामध्ये लोखंडी रॉड घेऊन डोके फोडून दुखापत केली. तर गोरख शिवाजी चव्हाण ,मच्छिंद्र शिवाजी चव्हाण ,गोविंद नंदू चव्हाण सर्व राहणार देऊळगाव गात यांनी (Selu Crime) लाथा भुक्क्याने मारहाण केली.
घटनेतील चारही आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी निवृत्ती सतीश शेलार यांने दिलेल्या तक्रारीवरून अशोक चव्हाण, गोरख चव्हाण, मच्छिंद्र चव्हाण, गोविंद चव्हाण सर्व राहणार देऊळगाव गात तालुका सेलू यांच्यावर (Selu Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत.