परभणी जिंतूर रस्त्यावरील देशमुख टाकळी येथे उभे केले होते वाहन
सेलू (Selu Crime) : शहरातील सातोना रस्त्यावर असलेल्या वाहेद पठाण यांच्या ऑक्सी डिलक्स पाणी बॉटल फॅक्टरी जवळ उभा करण्यात आलेले हे पिकअप वाहन आज्ञात दोन चोरट्यांनी (Selu Crime) १६ जुलै रोजी मध्यरात्री २:३० वाजता लंपास केले होते. ते पिकअप वाहन सोमवार २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता परभणी- जिंतूर रस्त्यावरील देशमुख टाकळी परिसरातून पोलीसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सेलू पोलीस (Selu Police) ठाण्यात दुपारी ३ वाजता लावण्यात आले आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे वालूर येथील वाहेद पठाण यांच्या मालकीच्या ऑक्सी डिलक्स या पाणी बॉटल फॅक्टरीच्या समोर दररोज प्रमाणे चालक सदानंद भिसे यांनी वाहन लावले होते. घटनेच्या दिवशी १६ जुलै रोजी रात्री २:३० वाजता हे वाहन चोरीस गेले असल्याचे कळताच (Selu Crime) याप्रकरणी १८जुलै रोजी (Selu Police) सेलू पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज पहात तपास करत असताना आणि प्रसार माध्यमात आलेल्या बातम्या मुळे जालना आणि परभणी येथे वाहन नेऊन त्याची विल्हेवाट लावता न आल्यामुळे मागील तीन दिवसापासून परभणी- जिंतूर रस्त्यावरील देशमुख टाकळी जवळ आढळून आले.
तीन दिवस एकाच ठिकाणी वाहन उभे असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी पिक अप वाहनावर असलेल्या नंबर वर सोमवार २३ जुलै रोजी सकाळी ११वाजता संपर्क केला. तेव्हा हे वाहन सातोना रस्त्यावरून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. पोलीस हवलदार मधुकर जाधव व पोलीस शिपाई लखन जीवने यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहन ताब्यात घेऊन सेलू पोलीस ठाण्यात दुपारी तीन वाजता पुढील कार्यवाहीस्तव दाखल केले आहे. (Selu Police) पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांचा तपास आणि प्रसारमाध्यमातील बातम्यांमुळे अज्ञात दोन चोरट्यांना या वाहनाची सहजासहजी विल्हेवाट लावता आली नाही. वाहन पळून नेल्या नंतर या (Selu Crime) वाहनातील कोणत्या हि साहित्याची चोरी झाली नसल्याची माहिती सातोना रस्त्यावरील ऑक्सि डिलक्स पाणी बॉटल फॅक्टरीचे मालक वाहेद पठाण यांनी दिली आहे.