सेलु (Selu Police) : सेलू पोलीस ठाणे अंतर्गत (Selu Police) असलेल्या मानोली तालुका मानवत शिवारात सोमवार १० जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ढगफुटी सद्रस्य पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे परिसरातील चंदनसेना (River floods) नदीस आलेल्या पुरात दोन महिला वाहून गेल्या. त्यापैकी एक महिला सापडली असून, दुसऱ्या महिलेचा मृतदेह मंगळवार ११ जून रोजी झोडगाव परिसरात आढळून आला आहे.
मानोली शिवारातील घटना
७ जून पासून मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर मानोली परिसरात फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणीच्या तयारीत असलेल्या बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असताना मानोली येथे सोमवारी काही भागात जोरदार पाऊस झाला मानोली परिसरात तर ढगफुटी सद्रस्य पाऊस झाल्याने पावसामुळे मानोली येथील चंदनसेना नदीला मोठा पूर आला. या (River floods) पुरात सुनिता धुराजी लव्हाळे वय ४० वर्षे व रंजना भास्कर सुरवसे वय ४५ वर्षे या दोन महिला वाहून गेल्या. ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर रंजना भास्कर सुरवसे ही महिला झुडपाला घट्ट धरलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांना तात्काळ मानवत येथील रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. परंतु सुनीता धुराजी लव्हाळे या महिलेचा रात्री आठ वाजेपर्यंत महसूल व पोलीस पथकाने शोध घेतला. त्यानंतर शोध कार्यात अडचणी येत असल्यामुळे थांबवण्यात आले.
वाहून गेलेल्या महिलेचे प्रेत सापडले
मानवतचे तहसीलदार पांडुरंगाचे माचेवाड, (Selu Police) सेलू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण ,पोलीस पाटील बबन तळेकर, मानोलीचे ग्रामस्थ हे मदत कार्यात सहभागी झाले होते. पुरात वाहून गेलेल्या सुनीता लव्हाळे या महिलेचा मृतदेह मंगळवार ११ जुन रोजी सेना नदीच्या झोडगाव परिसरात आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी कोल्हा येथील (Selu Hospital) प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. मयत सुनिता लव्हाळे यांच्या पार्थिवावर मानोली येथील स्मशानभूमीत आज दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या (River floods) घटनेमुळे मानोली सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान मयत सुनिता लव्हाळे यांच्या पश्चात सासू, नवरा ,दोन मुलं, दोन मुली असा परिवार आहे.