तब्बल 18 लाखाचा मुद्देमाल हस्तगत
परभणी/ सेलू (Selu police Major action) : एका वाहनातून लाखो रुपयांचा गुटखा घेऊन जाणार्या वाहनाची सेलू पोलिसांनी तपासणी केली असता तब्बल १३ लाख ८६ हजाराचा प्रतिबंधीत गुटखा आढळून आला. (Selu police) पोलिसांनी वाहनासह एकुण १८ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करत एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. मागील काही दिवसापासून सेलू तालुक्यात अवैध धंदे फोफावले आहेत. अवैध दारु, मटका, जुगार, गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. मंगळवार १ ऑक्टोबर रोजी सेलू पाथरी रोडवरुन जाणार्या एमएच २२ एएन.३५१३ या क्रमांकाच्या अशोक ललॅड मालवाहू वाहनांची (Selu police) पोलिसांनी झडती घेतली.
परभणी पोलिसांना गुटख्याचा केंद्रबिंदू मिळेना
यावेळी मानवी आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. ७२ पिशव्यामध्ये प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळून आला. तब्बल १३ लाख ८६ हजार रुपयाचा साठा सेलू पोलिसांनी हस्तगत केला. या (Selu police) कारवाईत गुटख्याचा साठा व वाहन असा एकुण १८ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त करुन भारत पांडूरंग डाके, नवनाथ राजेभाऊ बोटे या दोघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोनि. दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.भाग्यश्री पुरी, बीट जमादार ज्ञानेश्वर जानगर हे करत आहेत.
सलू पोलिस अॅक्शन मोडवर
सेलू पोलिस (Selu police) नेहमीच छापे मारत आहेत, मात्र ठोस कारवाई होत नसल्याने अवैध धंदेचालकांचे मनोबल वाढत आहे. मध्यंतरी तालुक्यात गुटखाविक्रीवर धडक कारवाई करण्यात आली होती. मात्र नंतर पुन्हा गुटखा माफियांनी डोके वर काढले आहे. शहरातील प्रत्येक भागात दुकान, पानटपरीवर सर्रास गुटख्याच्या पुड्या मिळत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह युवापिढी व्यसनाच्या आहारी जात आहेत. सर्वसामान्य नागरीकांतून गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (Selu police) सेलू पोलिसही आता अॅक्शन मोडवर आले आहेत. अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येत आहेत. त्यामुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत.