परभणीच्या सेलू तालुक्यातील डिग्रस जहागीर येथील घटना
परभणी/सेलू (Selu Police) : तालुक्यातील डिग्रस जहागीर येथील एका इसमास जालना पोलीसांनी २९ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास उचलल्याच्या घटनेने डिग्रस जहागीर सह तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. जालना पोलीसांना एका दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी हवा होता. हा आरोपी पाहुना म्हणून डिग्रस जहागीर येथे नातेवाईकाकडे असल्याचे पोलीसांना कळले तेव्हा पोलीसांनी त्या पाहुण्या ऐवजी नातेवाईक यांनाच उचलून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत डिग्रस जहागीर येथील (Selu Police) पोलीस पाटील यांचे पती यांच्याकडे चौकशी केली असता. मला फक्त गावच्या एका इसमास पोलीस घेऊन गेल्याचे कळले असल्याचे सांगितले. जालना जिल्ह्यातील पोलीसांचे वाहन २९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी तीन च्या सुमारास सेलू -सातोना रस्त्यावर आपले वाहन थांबून या परिसरात चौकशी करत होते. बाहेर गावचे वाहन असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
परंतु याच वाहनातून ही सर्वजण डिग्रस पोळ येथे दाखल झाले तेव्हा देखील ग्रामस्थांनी फारशी चौकशी केली नाही. परंतु ज्यांच्या घरी त्यांना जायचे होते.तेथील संबंधित आरोपी फरार झाल्याचे कळल्यावर जालना पोलीसांनी त्यांना हवा असलेल्या आरोपी पाहुण्या ऐवजी ज्या नातेवाईकाकडे आरोपी थांबला त्यालाच उचलून नेले आणि या उचलून नेणार्याचे नाव रावसाहेब देविदास पौळ असल्याचे कळले. नेमका हा काय प्रकार आहे. याची शहनिशा करण्यासाठी (Selu Police) सेलू पोलीसासह डिग्रस जहागीर येथील पोलीस पाटील यांच्याकडे चौकशी केली असता ऐवढीच माहिती मिळू शकली. दरम्यान जालना पोलीसांनी उचलून नेलेल्या आरोपी ऐवजी नातेवाईकाला अद्यापही सोडले का नाही हे मात्र कळू शकले नाही.