सेलू शहरातील एकबाल नगर येथे कारवाई, १६ जुगार्यांना पकडले
परभणी/सेलू (Selu police) : शहरातील एकबाल नगरात सुरू असलेल्या तिर्रट जुगार्यांवर पोलीसांच्या पथकाने रविवार २२ सप्टेंबर रोजी छापा टाकला. या कारवाईत १६ जुगार्यांना ताब्यात घेण्यात आले असून १ लाख २८ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी (Selu Police) सेलू पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एकबाल नगर मधील सय्यद एजाज इस्माईल यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत काही इसम जुगार खेळत बसले होते. या ठिकाणी (Selu Police) पोनि दिपक बोरसे, स्थागुशाचे पोउपनि गोपिनाथ वाघमारे, सपोनि प्रभाकर कवाळे, पोउपनि प्रमोद देशमुख, पोह शेख उसमान, किर्तेश्वर तेलंग, विलास सातपुते, मधुकर गोरे यांच्या पथकाने छापा टाकला. सदर प्रकरणी पोना विष्णू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शेखर दिलीपराव कथले, शेख मोहिम, योगेश राजेंद्र काळबांडे, आकाश बननराव इगवे, अक्षय रामदास सोळंके, करण सोपान ढवळे, शेख फौजान शेख इस्माईल, शेख रहिम शेख सिकंदर, शेख नसीर शेख कबीर, शेख मुख्तार शेख अब्दुल, शेख रईस शेख नजीर, शेख अस्लम शेख आरेफ, शेख युनुस शेख अब्दुल, इमरान पाशा कुरेशी, शेख महेबुब शेख अब्बास, सय्यद एजाज सय्यद इस्माईल यांच्यावर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. (Selu Police) पोनि दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह शेख उस्मान तपास करत आहेत.