कारवाई मात्र लांबणीवर ;परभणीतील सेलु शहरात उडाली खळबळ
परभणी/सेलू (Selu police) : सेलू शहरातील आयेशा कॉलनी मधून पोलीसाच्या पथकाने अचानक धाड घालून एक ट्रक आणि एक पिकअप वाहन ७ऑक्टोबर रोजी रात्री १:३० वाजता ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी दोन्ही वाहन (Selu police) पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. याप्रकरणी बुधवार ९ ऑक्टोबर रोजी अद्यापही या वाहनाच्या संदर्भात तांत्रिक अडचणीमुळे कोणावर देखील कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
पोलीसांनी पकडलेले ट्रक आणि पिकअप या दोन्ही वाहनात सुमारे ६९ क्विंटल तांदूळ असून नेमका हा तांदूळ कोणाचा आहे. हे प्रकरण मात्र गुलदस्त्यातच आहे. याबाबतची उपलब्ध माहिती याप्रमाणे शहरातील आयेशा कॉलनी परिसरात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, (Selu police) पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत, पोलीस हवालदार डि.एस.तेलंग, पोलीस हवालदार सुरेश पुलाते, चालक पोलीस शिपाई सुनील बोराडे यांनी घटनास्थळी आयेशा कॉलनी येथे एक ट्रक आणि एक पिकअप वाहन उभे असलेले आढळून आले. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी रात्री १:३० सुमारास घडली.
पोलीसांनी दोन्ही वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावण्यात आली असून यामध्ये सुमारे ६०क्विंटल तांदळाची पोते आहेत.बुधवार ९ ऑक्टोबर रोजी अद्याप पर्यंत या वाहनाचे चालक अथवा या वाहनाचे मालक यांना चौकशीसाठी पोलीसांनी उचलले नाही. आणि कारवाई देखील केली नाही. काही तांत्रिक अडचणीमुळे गुन्हा दाखल प्रकरण प्रलंबित आहे. एवढीच माहिती यासंदर्भात पोलीसांकडून प्राप्त झाली आहे. (Selu police) पोलीस ठाण्यात लावण्यात आलेली हि वाहने पाहण्यासाठी अनेक जण चकरा मारत आहेत.आणि विलंब होणाऱ्या कारवाई ची चर्चा करत आहेत.एकंदरीत या पकडलेल्या वाहनामुळे आणि होत नसलेल्या कारवाईमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.