कामेकर साहेब परभणीच्या सेलूत राष्ट्रीय महामार्गावरील लाईट झगमगणार कधी
सेलू (National Highway) : परभणी/सेलू शहरातून जाणाऱ्या देवगाव फाटा इंजेगाव या (National Highway) राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी वरील रस्त्यावरील दिवे मागील दोन महिन्यापासून अर्धवट कामामुळे बंदच आहेत. मंगळवार २ जुलै रोजी रस्त्यावरून जाणारे पादचारी, वाहनधारक म्हणत आहे की,राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता कामेकर साहेब या रस्त्यावरील पथदिवे कधी झगमगणार आहेत.
सरस्वती कन्ट्रक्शन या नामांकित कंपनीने राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी वरील डिग्रस पाटी ते सेलू रेल्वे गेट पर्यंत काम हाती घेतले होते. एकंदरीत कामाचे गुणवत्ता पाहिली तर विविध कामावर प्रबंध लिहून होईल. पण (National Highway) राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता कामेकर साहेब यांच्या दृष्टीने सर्व उच्च प्रतीचे काम झाले असे फक्त त्यांनाच वाटते.आता सिमेंटचे काम संपले असून विद्यानगर ते जिंतूर नाका या (Selu Road) रस्त्यावरील लाईट ओढण्याचे काम अद्यापही तसेच आहे. रायगड कॉर्नर ते जिंतूर नाका दुभाजक बंद करण्याचे काम रेंगाळत ठेवलेले आहे. मजेशीर बाब म्हणजे शासकीय विश्रामगृहाचा दर्शक फलक विवेकानंद नगरच्या रस्त्यावर लाऊन वेगळाच प्रताप केला आहे.
सरस्वती कंपनीने सोडली अर्धवट कामे
इतरही दर्शकफलक कौतुक करण्यासारखेच लावलेले आहेत. पाथरी रस्त्यावर आणि तहसील रस्त्यावर नालीवरील सिमेंटचे आच्छादन किती तकलादु आहे. हे (Selu Road) रस्त्यावरील जाणाऱ्यांना दिसते. एकंदरीत या गुत्तेदाराने त्यांच्या एजन्सीला शोभेल असे काम न करता कामाच्या गुणवत्तेची शोभाच परिसरातील जनतेला दाखविली आहे. मागील दोन महिन्यापासून रस्त्यावरील लाईटचे काम अर्धवट ठेवल्यामुळे पथदिवे बंदच आहेत. म्हणून या (National Highway) रस्त्यावरून जाणारे पादचारी,वाहनधारक म्हणत आहेत. कामेकर साहेब लाईट कधी झगमगणार आहेत.