मानोली शिवारातील घटना
सेलू (Selu Youth suicide) : परभणी/सेलु पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या मानोली तालुका मानवत परिसरात एका १७ वर्षीय तरुणाने शुक्रवार ५ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन (Youth suicide) आत्महत्या केली. या आत्महत्याचे कारण मात्र समजू शकले नाही. यासंदर्भात (Selu Police) सेलु पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
याबाबतची माहिती याप्रमाणे सेलु पोलीस ठाण्या अंतर्गत मानोली तालुका मानवत परिसरात विठ्ठल रावण सेलारकर यांच्या शेतामध्ये शुक्रवार ५ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास इंद्रमोहन नवनाथ येटेकर वय १७ वर्षे राहणार मानवत या तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या (Youth suicide) केली. ही घटना परिसरातील लोकांना आलेल्या आवाजामुळे घटनास्थळी धाव घेऊन घडलेल्या या घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आल्यानंतर सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, पोलीस हवालदार डी.एस. जानगर,पोलीस नायक कोपनर, मानोलीचे पोलीस पाटील बबन तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन दुपारी साडेचार च्या सुमारास या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह मानवत येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याबाबतची नोंद (Selu Police) सेलू पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून या तरुणाने नेमकी कशामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्यापही समजू शकले नाही.