परभणी/सेलू (Selu thieves) : तालुक्यातील देऊळगाव येथे अज्ञात चोरट्यांनी गावात वेगवेगळ्या ठिकाणी घरी कोणीही नसल्याची संधी साधून एका किराणा दुकानासह तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला यापैकी एका ठिकाणी रोख २५ हजार रक्कमेसह ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे .ही घटना १६ऑगस्ट रोजी सायंकाळी ते१७ऑगस्ट रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली. (Selu thieves) यासंदर्भात पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे. तालुक्यातील देऊळगाव गात येथे एका किराणा दुकानासह तीन ठिकाणी आज्ञात चोरट्यांनी घरी कोणीही नसल्याच्या संधीचा फायदा घेत घरफोडी केली.
यामध्ये अँड.शंकर चंद्रकांत कदम यांच्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.घरातील सामान अस्ताव्यस्त करून लोखंडी कपाट तोडले कपाटात असलेले नगदी २५ हजार रुपये आणि एक ग्राम सोन्याची राखी असा ३०हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. देऊळगाव गात येथे जगन जाधव यांचे किराणा दुकान देखील फोडले त्यांचा किती ऐवज लंपास केला हे मात्र कळू शकले नाही. याशिवाय पांडुरंग माने आणि रामचंद्र गोरे यांच्या देखील अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले.
या घटनेची माहिती कळतात पोलीस निरीक्षक दिपक बोरसे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर, पोलीस पाटील मारोती साखरे, स्वान पथकाचे प्रवीण उलंगपाड यांनी घटनास्थळी भेट दिली . ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते त्याचा काहीच उपयोग होऊ शकला नाही. अँड शंकर चंद्रकांत कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार अन्वये (Selu thieves) अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत.