परभणी/सेलू (Selu Youth Death) : तालुक्यातील वालूर येथील एका २८ वर्षीय तरुणाचे पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून निधन झाल्याची घटना बुधवार १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता वालूर शिवारातील शेत गट नंबर ४६/६ मध्ये घडली आहे. याबाबत (Selu Police) पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील वालूर येथील शिवारात शेत गट नंबर ४६/६ मध्ये असलेल्या विहिरीत बुधवार १८ सप्टेंबर रोजी सकाळी ७वाजता सखाराम लक्ष्मण दराडे वय २८ वर्षे हा तरुण पाणी आणण्यासाठी गेला असता अचानक पाय घसरून विहिरीमध्ये पडल्याने पाण्यात बुडून (Youth Death) मरण पावला.
या घटनेची माहिती वालुर दूरक्षेत्र पोलीस चौकीतील पोलीसांना कळताच पोलीस हवालदार मारोती जाधव, पोलीस नायक गुलाब राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलु उपजिल्हा रुग्णालयात (Selu Hospital) आणण्यात आले. वालूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल तोडकर यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले. मयत सखाराम दराडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. (Youth Death) मयताचा चुलतभाऊ नारायण बाळाभाऊ दराडे यांनी दिलेल्या माहितीवरून (Selu Police) सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुकेश बुधवंत पुढील तपास करत आहेत.