हिंगोली (Sengaon Action) : सेनगाव तालुक्यात (Sengaon taluka) अवैध रेतीचे वाहतूक (Illegal sand) होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये २४ तास फिरते पथक व लिंबाला तांडा, बरडा, पिंपरी येथील शासकीय रेती डेपोवर कार्यरत वेळेमध्ये म्हणजे सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंत बैठे पथकाची नियुक्ती केली आहे. सदर पथकामध्ये तहसील कार्यालय सेनगाव येथील तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहायक, कोतवाल यांची नियुक्ती केली आहे.
रेतीची अवैध वाहतुक करणार्या वाहनांवर कारवाई
आज पहिल्याच दिवशी फिरत्या पथकाने मोठी कारवाई (Sengaon Action) केली. सदर कारवाईत एमएच ३८ एक्स १०१० या क्रमांकाचा रेतीने भरलेला हायवा (Illegal sand) अवैध वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे जप्त करून पोलीस स्टेशन सेनगाव येथे जमा करण्यात आला आहे. सदर कारवाई मध्ये प्रभारी तहसीलदार अनिल सरोदे, मंडळ अधिकारी घुगे, बोडखे, व तलाठी पठाण, प्रशांत देशमुख, काळबांडे, दिनेश ढगे, व कोतवाल गिरी यांचा समावेश होता. सदर कार्यवाहीत अंदाजे तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करून (Sengaon Police) पोलीस स्टेशन सेनगाव यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.