चंद्रपूर(Chandrapur) :- राज्य परीवहन महामंडळात(State Transportation Corporations) चंद्रपूर येथे चालक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्याचा अपघात झाला होता. अपघातानंतर पुन्हा नोकरीवर रूजू होण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज होती.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील प्रकरण
येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्रमाणपत्र मागणार्या या चालकाकडून १० हजार रूपयाची लाच घेतांना वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ सहायक अशोक बाबुराव बगुलकर (५८) व वरिष्ठ लिपीक दिपक केशवराव सज्जनवार (३६),यांना आज लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. तक्रारदार ही मौजा वेडाबाई, ता. वणी, जि. यवतमाळ (Yavatmal) येथील रहीवासी असुन एस. टी. महामंडळ चंद्रपूर (Chandrapur)येथे चालक पदावर नोकरीस आहेत. तक्रारदार यांचे माहे मार्च २०२२ मध्ये बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे अपघात झाल्याने त्यांच्या पायात रॉड टाकण्यात आलेला होता, काही दिवसानंतर पायात टाकलेल्या रॉडचे स्क्रू तुटून पायात पायजन झाले असल्यामुळे त्यांनी एम्स हॉस्पिटल नागपूर येथे उपचार केला होता. सदर उपचारादरम्यान तक्रारदार हे रजेवर होते. उपचार केल्यानंतर तक्रारदार यांना ड्युटीवर रुजू होण्याकरता वैद्यकीय अधिकारी यांचे वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने ते माहे जुन २०२४ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णास चंद्रपूर येथे तपासणी करीता गेले, तपासणी करून फिट फार लाईट डयुटी एक्सपेक्ट ड्रायव्हिंग असा शेरा नमूद करून वैद्यकीय अहवाल (Medical reports)कार्यालयात सादर केला होता.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे वैद्यकीय अहवाल देण्याबाबत अर्ज केला
परंतु वैद्यकीय अहवालामध्ये ते चालक पदाची कामगिरी करण्याबाबत स्पष्ट नमूद नव्हते, त्यामुळे तक्रारदार यांनी वैद्यकीय मंडळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे वैद्यकीय अहवाल देण्याबाबत अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार हे वैद्यकीय महाविद्यालय येथील वरिष्ठ सहायक(senior Assistant) आलोसे क्र १ श्री बगुलकर यांना वारंवार भेटून वैद्यकीय अहवाल देण्याबाबत विनंती केली परंतु त्यांनी तक्रारदार यांना वैद्यकीय अहवाल देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यानंतर दि. १८/०६/२०२४ रोजी आलोसे क्रं. १ बगुलकर यांनी तुला लगेच वैद्यकीय मंडळाचे अहवाल पाहिजे असल्यास १०,०००/- रुपये माझेकरीता द्यावे लागतील नाहीतर तुझे काम होणार नाही असे म्हणून लाच रकमेची मागणी केली.