परभणी (Parbhani):- तु मला शिवीगाळ का केली, अशी विचारणा केल्यावर एकाला जबर मारहाण (beating)करण्यात आली. ही घटना परभणी शहरातील परसावत नगर येथे घडली. सदर प्रकरणी २ जुलै रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राष्ट्रकुट यांनी तक्रार दिली.
परभणी शहरातील परसावत नगर येथील घटना
फिर्यादी हे एकाच्या घरासमोर बसलेले होते. यावेळी दोघेजण गाडीवरुन फिर्यादीला कट मारुन विनाकारण शिवीगाळ करत निघून गेले. यावेळी भैय्या कानडे याने फिर्यादीला त्या दोघांनी तुला शिवी (Abusing)का दिली, असे म्हणाला. यावर फिर्यादीने त्यांनी मला शिवी दिली नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर भैय्या कानडे याने फोनकरुन संबंधिताला बोलावून घेतले. समोरील व्यक्तीने मी तुलाच शिवी दिली, असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. सोबत असलेल्या इतरांनी देखील फिर्यादीस मारहाण केली. यामध्ये संजय राष्ट्रकुट गंभीर जखमी (seriously injured) झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान दिलेल्या तक्रारीवरुन परशा गवळी, भैय्या कानडे, बंटी ठोके व इतर एकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.