औसा (Buthoda Accident) : औसा ते लातूर राष्ट्रीय महामार्गावरील बुधोडा उड्डाणपुलानजीक कुरिअर पार्सल घेऊन जाणारा टेम्पो टायर फुटल्याने उलटला. यात दोघेजण गंभीर जखमी झाले. औसा शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. अपघातातील जखमींची नावे समजू शकली नाहीत.
औसा शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर बुधोडा (Buthoda Accident) येथील उड्डाणपुला नजीक कुरियर पार्सल घेऊन जाणारा टेम्पो टायर फुटल्याने उलटला. यात दोघे जण गंभीर जखमी झाले. बुधवारी (दि.11) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लातूर येथून औसा शहराकडे कुरिअर पार्सल घेऊन टेम्पो (क्रमांक एमएच 24/ ए 9443) येत होता. बुधोडा येथील उड्डाणपूल संपण्याच्या ठिकाणी टायर फुटल्यामुळे टेम्पो उलटला. कुरिअर पार्सल वाहून नेणाऱ्या या टेम्पोमधील दोघे जण गंभीर जखमी झाले.
ही (Buthoda Accident) घटना घडल्यानंतर बुधोडा गावातील नागरिकांनी ॲम्बुलन्स बोलावून जखमींना लातूरच्या दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यास मदत केली. जखमींची नावे मात्र अद्याप समजू शकली नाहीत. वृत्त लिहिपर्यंत याबाबत पोलिसात नोंद झाली नव्हती.