शेकडो एकरातील तिळ भिजला पावसात
प्रत घसरण्यासोबतच उत्पादनात घट येण्याची शक्यता
वर्धा (Heavy Rain) : जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून सातत्याने वादळवारा, अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मंगळवारी झालेल्या वादळवार्यासह पावसात तिळाचे मोठे नुकसान झाले. तिळ पिकाचे अतोनात (Heavy Rain) नुकसान झाल्याने तिळ उत्पादक शेतकरी चिंतातून झाले आहेत. तिळाची प्रत घसरण्यासोबतच उत्पादनात घट येण्याची चिन्हे असल्याने तिळाला जबर फटका बसला आहे.
यावर्षी तिळाच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर क्षेत्रामध्ये तिळाची लागवड करण्यात आली आहे. हमखास उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याने शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात तिळाची लागवड केली. पण, अवकाळी पाऊस आणि (Heavy Rain) वादळवार्याने तिळाच्या पिकाला जबर फटका बसत आहे.
सध्या तिळ कापणीची तसेच काढणीची कामे सुरू आहेत. अनेक शेतकर्यांनी तिळाची कापणी केली आहे. कापणी केलेला तिळ शेतातच उघड्यावर आहे. तिळाची कापणी करून उन्हात वाळल्यानंतर तिळ काढण्यात येतो. अनेक शेतात तिळ कापणी करून उघड्यावर पडलेला आहे. अनेक शेतात तिळ कापणीची प्रतिक्षा आहे. अनेक (Heavy Rain) शेतकर्यांनी कापणी केलेल्या तिळाचे गठ्ठे बांधून ठेवले आहे.
दुपारी उन्हात वाळवल्यानंतर तिळ काढण्यात येतो. पण, ढगाळ वातावरण आणि (Heavy Rain) अवकाळी पावसाने तिळ उत्पादक शेतकर्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. पावसात तिळ भिजल्याने तिळाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. तिळ भिजल्याने त्याची प्रतही घसरून त्याचा भावावर परिणाम होणार आहे, तसेच उत्पादनातही घट येण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे तिळ उत्पादक शेतकर्यांना वादळवारा, पावसाचा जबर तडाखा बसून नुकसान सहन करावे लागण्याची स्थिती आहे.
