11879 क्युमेक्स ने विसर्ग सुरू
कळमनुरी/हिंगोली (Isapur Dam) : इसापूर धरण परिसरामध्ये व पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढत चालली आहे. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता (Isapur Dam) इसापूर धरणाचे सात वक्र दरवाजे (2,14,8,7,9,6,10) 50 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून 11879 क्युमेंक्स इतका विसर्ग चालू आहे.
या आधी 25 सप्टेंबर रोजी तीन दरवाजे 10 सेंटीमीटर उघडण्यात आले होते. सद्यस्थितीत पैनगंगा नदीपात्रात .11879…. क्युमेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे व कमी करण्याबाबतचा निर्णय धरण पूरनियंत्रण कक्ष करणार आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे पैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या (Isapur Dam) इसापूर धरणाची पाणीपातळी 440.98 मीटर आहे. तर धरणात 962.1866 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या धरणात 99.80 टक्के जलसाठा आहे.