कारंजा(Washim) :- स्थानिक सिंधी कॅम्प ते तहसील कार्यालय(Tehsil Office) यादरम्यान रहदारी करणाऱ्या सात जणांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कारंजा शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात
कारंजा शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता हे कुत्रे (Dog)मानवाच्या जीवावर उठले आहेत. अशात एक पांढऱ्या रंगाचा कमी उंचीचा कुत्रा चावत सुटला आहे. त्याने १ व २ ऑगस्ट अशा दोन दिवसात सुमारे सात नागरिकांच्या पायाला चावा घेतला आहे. ज्यामध्ये काही शाळकरी मुलांसह वृद्ध महिलेचा देखील समावेश आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने दहशत माजवल्याने नागरिकात भीतीचे(fear) वातावरण पसरले आहे. दरम्यान, सर्व जखमींनी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात(Upazila Hospitals) उपचार घेतले असून, एकाच मार्गावर एकाच कुत्र्याने अनेकांना चावा घेतल्याने त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.