पुसद (Pusad crime) : शहर पोलीस स्टेशन (Pusad police) अंतर्गत येत असलेल्या नवीन पुसद येथे दि. 5 मे रोजी रात्री दरम्यान जुन्या वादाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका युवकास धारदार चाकूने पोटात भोकसून जीवघेणा चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. माहितीनुसार, या दुर्घटनेत सुदैवाने जखमी युवकाचा मृत्यू झाला नसून, मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे यवतमाळ येथील (Vasantrao Naik Hospital) वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
पुसदमध्ये गुन्हेगारांचा बिनधास्त वावर
दि. 5 मे रोजीच्या रात्री अंदाजे 10 वाजून 45 मिनिटांनी दत्ता सुभाष कवठाळे वय अंदाजे 23 वर्ष रा. नवीन पुसद यास गुड्डू मदने , निखिल हजारे , विवेक केशवे , व गोपाल पांढरे सर्व रा. नवीन पुसद यांनी मिळून धारदार चाकूने दत्ता सुभाष कवठाळे याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यामध्ये दत्ता याच्या पोटात डाव्या बाजूला चाकू चा वार झाला. अक्षरशः पोटातील आतडे बाहेर आले. ही घटना घडताच , तात्काळ तेथील उपस्थित लोकांनी जखमी दत्ता सुभाष कवठाळे यास रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यास यवतमाळ येथे रेफर करण्यात आले.
शासकीय रुग्णालयात यवतमाळ रेफर
जखमी दत्ता कवठाळे याचे भाऊजी नितीन विश्वनाथ भिसे वय 34 वर्ष रा. नवीन पुसद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर (Pusad police) पोलीस स्टेशन पुसद येथे गुड्डू मदने , निखिल हजारे , विवेक किशवे , व गोपाल पांढरे यांच्याविरुद्ध भादवी कलम 307 , 330 , 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात विशेष म्हणजे, या घटनेतील आरोपी मधील गुड्डू मदने व विवेक किशवे यांनाही मार लागला असल्याने यवतमाळ येथे त्यांना रेफर करण्यात आले. परंतु त्यांना हे मार कशामुळे लागला आहे अद्याप अस्पष्ट आहे. उर्वरित दोन आरोपी निखिल हजारे व गोपाल पांढरे हे फरार आहेत.
शहरात पुन्हा टोळी युद्ध सुरू
घटनेचा पुढील तपास (Pusad police) पुसद शहर पोलीस स्टेशनचे एपीआय बांडे हे करीत आहे. या (Pusad crime) घटनेने शहरात एकच खळबळ माजली असून शहरात पुन्हा टोळी युद्ध सुरू होण्याची चिन्हे निर्माण झालेली दिसत आहेत. हे विशेष पोलीस प्रशासन मात्र या घटनांकडे गांभीर्याने बघत नसल्यामुळे शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. एकीकडे उन्हाचा प्रकोप सर दुसरीकडे गुन्हेगारांचा ताप यामध्ये मात्र सर्वसामान्य जनता होरपळून जात आहे हे विशेष.