नालीच्या अर्धवट कामामुळे तयार झाले सांडपाण्याचे डबके
डासांची उत्पत्ती, हिवताप संक्रमण होण्याची शक्यता
कुरखेडा (Gadchiroli) : कुरखेडा शहरात (Kurkheda city) मागील चार ते पाच महिन्यापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. त्या अंतर्गत कंत्राटदाराने महामार्ग लगतच्या नालीचे बांधकाम सुरु केले. (Gadchiroli District) परंतु नियोजन शुन्य संथगतिने सुरु असलेल्या कामामुळे जिथे तिथे नुकतेच आलेल्या अवकाळी पावसामुळे पाणी साचून पाण्याचे डबके तयार झाले आहे. मोठ्या नाली लगतच गावातुन येणार्या नालीला तिला योग्य प्रकारे न जोडल्या मुळे गावातील सांडपाणी तिथेच थबकल्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे.
एकीकडे जिल्हातिल वरिष्ठ अधिकारी (Gadchiroli Hospital) डासांमुळे होणाऱ्या हिवताप व ईतर रोग पसरु नये, याकरिता उपाय योजना करीत आहेत. तर दुसरीकडे महामार्ग कंत्राटदारांच्या नियोजन शुन्य कामामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार नाली नजीकच्या रहिवाशांनी कंत्राटदारांच्या कार्यरत अभियंत्यास हि बाब लक्षात आणून दिली. परंतु मगरुर मुजोर स्वभाव गुण असलेला पर प्रांतीय अभियंता मी पणाचा आव आणत काम करीत असल्याचा आरोप परिसरातील रहिवासी करीत आहे. तरी हेतुपुरस्सर थांबवुन ठेवलेले नाली बांधकाम त्वरित सुरु करुन, परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याशी चालविलेला खेळ थांबवावा, अशी मागणी (Gadchiroli District) परिसरातील नागरिकांकडुन करण्यात येत आहे.