शाहरुख खानला ५ नोव्हेंबर रोजी जीवत मारण्याची धमकी देण्यात आली होती.
मुंबई (Shahrukh khan) : शाहरुख खानला धमकी देणारा आरोपी मोहम्मद फैजान खान याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मंगळवारी रायपूर येथून अटक केली. अभिनेत्याच्या टीमने वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये (Police Station) धमकी देणाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिस तपास सुरू करण्यात आला. ज्या क्रमांकावरून शाहरुखला धमकी देण्यात आली, तो नंबर रायपूरमध्ये राहणाऱ्या फैजान खान या वकीलाच्या नावावर नोंदवण्यात आला होता.
माहितीनुसार, मंगळवारी सकाळी मुंबई पोलिसांचे सीएसपी अजय सिंह आणि त्यांची टीम ट्रान्झिट रिमांडसाठी रायपूरला पोहोचली. येथे फैजानला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. धमकी मिळाल्यानंतर काही दिवसांनी पोलीस फैजान खानपर्यंत पोहोचले होते. मात्र, फैजानने 14 नोव्हेंबरला मुंबईत येऊन जबाब नोंदवणार असल्याचे सांगितले. फैजानने सुरुवातीच्या स्टेटमेंटमध्ये सांगितले होते की, (Shahrukh khan) शाहरुख खानला ज्या नंबरवरून धमकी देण्यात आली होती, तो नंबर त्याचाच आहे. मात्र धमकीच्या 3-4 दिवस आधी 2 नोव्हेंबरला त्याचा मोबाईल चोरीला गेला होता.
कुटुंबीयांचा दावा- फैजानला धमक्याही येत आहेत
फैजानच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, मुंबई पोलिस (Mumbai Police) त्याच्यापर्यंत आधीच पोहोचले होते. परंतु त्यांनी 14 नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात त्यांचे म्हणणे नोंदवण्याचे आवाहन केले होते. फैजानला गेल्या काही दिवसांपासून जीवंत मारण्याच्या धमक्या येत होत्या. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईत येण्याऐवजी ऑडिओ-व्हिडीओद्वारे स्वत:ची हजेरी लावावी, अशी विनंती फैजानने मुंबई पोलीस आयुक्तांना केली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली.
शाहरुख खानला मारून टाकेन
डीसीपीच्या म्हणण्यानुसार, वांद्रे पोलिस (Mumbai Police) स्टेशनला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. यामध्ये कॉलरने धमकी देत बॅण्ड स्टँडच्या (Shahrukh Khan) शाहरुख खानला मारेन, मला 50 लाख दिले नाहीत तर शाहरुख खानला मारेन. असे सांगितले. फोन करणाऱ्याला त्याचे नाव विचारले असता त्याचे उत्तर होते की, मला काही फरक पडत नाही, माझे नाव हिंदुस्थानी आहे. ही तक्रार मिळाल्यानंतर मुंबईतील तीन पोलिस अधिकारी रायपूरला पोहोचले. 6 नोव्हेंबरच्या रात्री तो रायपूरमधील एका हॉटेलमध्ये थांबला होता. पहाटे पंढरी परिसरातील मोबाईल सिमचे लोकेशन तपासल्यानंतर ते फैजानच्या घरी गेले. धमकीच्या कॉलबाबत सुमारे 2 तास चौकशी केली.
फैजानची पोलीस ठाण्यात सिम हरवल्याची तक्रार
चौकशीदरम्यान फैजानने सांगितले की, 2 नोव्हेंबर रोजी त्याचा मोबाईल हरवला होता. त्यासाठी त्याने 4 नोव्हेंबर रोजी खामर्डीह पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तर 5 नोव्हेंबर रोजी वांद्रे पोलीस (Mumbai Police) ठाण्यात धमकीचा फोन आला होता. त्याला 14 नोव्हेंबर रोजी पुन्हा मुंबईत चौकशीसाठी बोलावण्यात आले. पोलिस ठाण्यात तक्रारीची प्रत दाखवून फैजानला सोडून देण्यात आले. त्याला 14 नोव्हेंबर रोजी पुन्हा मुंबईत चौकशीसाठी बोलावण्यात आले.