नाशिक (Nashik):- निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांनी सुरू केलेल्या श्रमदान परंपरेला उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी यशोशिखरावर नेले. भारत मातेसाठी केलेल्या श्रमदानाच्या या समृद्धीदायी परंपरेचा सर्वत्र गौरव होत असून निवडणूकीत (Election) प्रचार करत असताना मतदारच शांतीगिरी महाराजांच्या या कार्याची आठवण करून देत कौतुक करत आहे.
नाशिक शहरासह राज्यभर मोफत रोपांचे वाटप
मागील वर्षी पर्यावरणाचा समतोल राखावा म्हणून नाशिक शहरासह राज्यभर मोफत रोपांचे वाटप करून एका तासात तब्बल ५ लाख वृक्षांची लागवड करण्याची किमया देखील महाराजांनी केली होती. कठोर तपस्वी (strict ascetic) निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल(Sardar Vallabhbhai Patel) सरोवर येथे देव-देश-धर्मासाठी तब्बल सव्वा कोटी तास श्रमदानाचा महासंकल्प केला होता. त्यानुसार सव्वा कोटी तास महाश्रमदानाच्या संकल्पपूर्तीकडे जय बाबाजी भक्त परिवाराची यशस्वीरित्या वाटचाल सुरू आहे. त्यानुसार देशभरातील ५०० ठिकाणी एकाच दिवशी १० लाख तास श्रमदान करण्यात आले. त्यात महाराष्ट्रासह १८ राज्यातील धार्मिक ठिकाणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) अनेक गडकिल्यांवर परिश्रमपूर्वक महाश्रमदान करण्यात आले.
प्रत्येक ठिकाणी १ श्रमदान प्रमुख व १०० श्रमदान सेवक
प्रत्येक ठिकाणी १ श्रमदान प्रमुख व १०० श्रमदान सेवक अशा प्रकारची रचना श्रमदान करतांना करण्यात आली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्य नियम विधी, आरती नंतर देशभरात ५०० ठिकाणी एकाच वेळी श्रमदानाचा (Shramdan) शुभारंभ करण्यात आला. श्रमदान मोहिमेत भविकांनी सदगुरू आदेशाचे पालन करत श्रमदानासाठी लागणारे साहीत्य स्वखर्चाने आणून उन्हाच्या तीव्रतेची तमा न बाळगता परिश्रमपूर्वक स्वच्छतेचे कार्य पुर्ण करुन गुरुनिष्ठेची अनोखी प्रचिती दिली. देशभरातील १८ राज्यात निष्काम भावनेतून राबविलेल्या या श्रमदान कार्याचा नागरिकांसह शासकीय यंत्रणांनी देखील विशेष गौरव केला. उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या प्रेरनेने जय बाबाजी परिवाराच्या इतिहासात इतक्या व्यापक स्वरूपात हा श्रमदान सोहळा संपन्न झाल्याने जगदगुरू जनार्दन स्वामी महाराजांनी सुरू केलेली श्रमदान परंपरा यशोशिखरावर गेली आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश जनसामान्यांच्या मनात रुजला.
महाश्रमदानाच्या मोहिमेमुळे ‘श्रमेव जयते’ ला देखील अधिक बळ
बाबाजींच्या या महाश्रमदानाच्या मोहिमेमुळे ‘श्रमेव जयते’ ला देखील अधिक बळ मिळाले असल्याची प्रतिक्रिया ठिकठिकाणच्या नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान अनंत विभूषित स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी राबविलेल्या या महाश्रमदानाच्या मोहिमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शांतीगिरीजी महाराज सध्या नाशिक येथून लोकसभेची (Lok Sabha) अपक्ष निवडणूक लढवत आहे.त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रचारा दरम्यान नागरिक त्यांच्या या कार्याची आठवण करून देऊन स्वागत करत आहे. देव-देश-धर्मासाठी अविश्रांत कार्य करणाऱ्या शांतीगिरिजी महाराजांच्या महाश्रमदान सोहळ्यांतर्गत एका तासात तब्बल ५ लाख वृक्षारोपणाची यशस्वी मोहीम राबवली होती. नागरिकांना घरपोच रोपांचे मोफत वाटप करण्यात आले असल्याचे स्वतःच नागरिकच आठवण करून देत आहे. शांतीगिरिजी महाराजांनी नुकतीच तब्बल २० पेक्षा जास्त किलोमीटर अंतराची सायकल दिंडी काढली. सायकल संस्कृतीला चालना मिळावी व प्रदूषणमुक्त नाशिक व्हावे यासाठी सायकल दिंडी निश्चितच प्रेरणदायी ठरेल असेही जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.