वसमत येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी शरद पवार यांची जाहीर सभा
वसमत/हिंगोली (Sharad Pawar) : महाराष्ट्रातील सरकार बदला महाविकास आघडीला सता द्या असे आवाहन करत महाविकास आघाडीला सत्ता द्या आम्ही पाच गोष्टीची गॅरंटी देतो, असा विश्वास देतो, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी वसमत येथील जाहीर सभेत दिले. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय मोदी सरकारने घेतले नाही. म्हणून त्यांना लोकसभा निवडणुकीत फटका बसला स्वबळावर त्यांना सरकार बनवता आले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वसमत येथील जिल्हा परिषद मैदानावर जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली.
वसमत विधानसभा मतदारसंघासाठी वसमत येथील जिल्हापरिषद मैदानावर शरद पवार (Sharad Pawar) यांची 8 नोव्हेंबरला जहिरसभा झाली सभेसाठी उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर,खासदार नागेश पाटील शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात,आमदार प्रज्ञा सातव, पंडितराव देशमुख, अब्दुल हफीज अब्दुल रहेमान. डॉ एम आर क्यातमवार, यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती. उमेदवार माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी प्रास्ताविक करताना आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना (Sharad Pawar) शरद पवार यांनी महाविकस आघाडी विरोधात जोरदार टीका केली.