विधानसभा निवडणुकीचे फुंकले रणशिंग
अर्जुनी मोर. (Sharad Pawar Group) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ता.०९ आगस्त पासून शिवनेरी किल्यावरुन शिवस्वराज यात्रेची सुरवात झाली. ती यात्रा आज अर्जुनी मोरगाव मतदार संघात (Assembly election) पोहचली. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आज ता.१० रोजी सायंकाळी ६ वाजता सभा पार पडली. सभेला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संबोधित करतांना अर्जुनी मोरगाव मतदार संघावर आपली दावेदारी ठोकली गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसातही कार्यकर्त्याच्या जमलेल्या तुफान गर्दीमुळे व सभेला मिळालेल्या जनतेच्या उत्तुंग प्रतिसादामुळे आघाडीतील दुसरा प्रमुख पक्ष आणि विधानसभा मतदारसंघात दावेदारी करणाऱ्या काँग्रेस पक्षातील संभाव्य उमेदवारांमध्ये व ईतर पक्षाच्या संभाव्य उमेदवारांत धास्ती भरल्याची चर्चा यानिमित्याने सुरू झाली.
सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), खासदार व अभिनेते अमोल कोल्हे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, प्रदेश कार्यकारिणीचे सुनिल गव्हाणे, पंडित कांबळे, शैलेन्द्र तिवारी, बजरंगसिंह परिहार, दिनानाथ पडोळे, दिलीप पनफुले, प्रदेश महासचिव यशवंतराव परशुरामकर, संचालक पणन महामंडळ अतुल गण्यारपवार, जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम, तीरथ हेतरे, बालु वंजारी, देवांदन तागडे, आशिष येरणे, मंजू वासनिक, रुपा गिरीपुंजे, शुभांगी राखडे,सुरेश खोब्रागडे आदी प्रामुख्याने उपस्थिती होते.सभेचे संचालन दिनेश कोरे तर आभार सुरेश खोब्रागडे यांनी केले.
संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) वतीने महायुतीच्या भोंगळ व भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी व महायुतीला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी राज्यभरात शिव स्वराज्य यात्रेची सुरुवात करण्यात आली. दरम्यान शिवस्वराज यात्रेच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी संबोधित करताना प्रफुल पटेल (Praful Patel) यांना धारेवर धरले, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे सरकार शेतकरी विरोधी आहे. महिलांच संरक्षण करू शकत नाही. मुली चिमुकली बालके असुरक्षित आहेत. बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे.
यासह अनेक प्रश्नांना वाचा फोडली. त्यानंतर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनीही सत्ताधारी भाजप प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी ईडी सीबीआय कारवाईच्या भीतीने वडिलां समान असणाऱ्या शरद पवारांना धोका दिला. माझ्यावर खोटे आरोप लावून तुरुंगात टाकल्याचे सांगून आमदार चंद्रिकापुरे यांच्यावर तासेरे ओढले. सरते शेवटी आलेल्या अमोल कोल्हे यांनी लढाई अजून संपलेली नाही. मागील निवडणूक आपण संविधान बचाव करण्यासाठी लढली. (Sharad Pawar Group) यावेळी आपल्याला देश वाचवायचा आहे. तुमच्या एका आमदाराचं मत हे बहुमूल्य असून इथला निवडून येणारा आमदार हा आपल्या देशाला हुकूमशाही लादण्यापासून वाचवू शकतो. त्यामुळे सर्वांनी एकत्रित राहून लढाई लढण्याचे आवाहन त्यांनी केले.
सगळ्यांच्या निशाणावर राजेंद्र जैन !
“ शिवस्वराज यात्रेला आलेल्या नेत्यांनी सभेला संबोधित करतांना सांगितले कि,पक्षाने ज्यांना काही नाही दिलं ते आज सोबत आहेत. मात्र शरद पवारांनी ज्यांना भरभरून दिलं त्यांनी गद्दारी केल्याचे सांगताना यात विशेषतः प्रफुल पटेल यांच्यापेक्षा माजी आमदार राजेंद्र जैन यांच्यावर सगळ्यांनी रोष व्यक्त केला. प्रफुल पटेल राजेंद्र जैनमुळे सामान्य जनता शरद पवार यांच्यापासून दुरावली प्रफुल पटेलला काही बोलाल तर राजेंद्र जैनलाच राग यायचा भाईजी आणि दिवाणजी या टोळीने पक्षाच वाटोळ केल्याचे वक्तव्य केले यावरून उपस्थिती जनसमुदायाने टाळ्याचा कडकळात झाला.”
अजित पवारांना हा ईतिहास मान्य आहे का ?
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज पुण्यात विधान केल त्यामुळे इतिहास जाणीवपूर्वक बदलाला जात असल्याचे सांगितले.झाडाझुडपांत असलेली समाधी १८८० साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधली केल. पहिली शिवजयंती साजरी केली मात्र आज मोहन भागवत यांनी केलेले विधान दुर्दैवी असल्याचे सांगून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या अजित पवारांना हा ईतिहास मान्य आहे का असा प्रश्न उपस्थिती करत हे सरकार आपल्या महापुरूषांचा इतिहास बदलत असल्याचा आरोप खा. अमोल कोल्ह्ये (Amol Kolhe) यांनी केला.