सदाभाऊ खोतांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करावे- आ. शिंगणे
बुलढाणा (Dr. Rajendra Shingane) : शरदचंद्र पवार (Sharad Pawar) हे केवळ एका पक्षापुरते मर्यादीत नेतृत्व राहिलेले नसून, त्यांच्या सर्वव्यापी उत्तुंग व्यक्तीमत्वामुळे ते महाराष्ट्राची राजकीय अस्मीता ठरले असून.. त्यांच्याबाबतीत अतिशय नीच पातळीवर जावून आ.सदाभाऊ खोत यांनी केलेल्या विधानाचा निषेध करुनच चालणार नाहीतर, या वक्तव्यासाठी महामहिम राज्यपालांनी त्यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करावे.. अशी मागणी सहकार नेते तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांनी केली आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातून डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवत आहे. प्रचारात व्यस्त असतांनाही, त्यांनी जसे सदाभाऊ खोत यांचे विधान त्यांना कळाले.. तसा निषेध त्यांनी व्यक्त केला.
खा. शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी कोणतेही वक्तव्य आले तरी, त्याचा निषेध डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांच्याकडून केला जातो. ते अजीतदादा गटात असतांनाही ज्यावेळी पंतप्रधान पवार साहेबांबद्दल बोलले होते, तेंव्हाही डॉ.शिंगणे यांनी त्या वक्तव्याचा निषेध केला होता. आ. डॉ. राजेंद्र शिंगणे हे राजकारणात शरदचंद्र पवार यांनाच सर्वस्व मानतात. त्यामुळे खोत यांचे ते वक्तव्य आल्यानंतर ते व्यथीत होवून डॉ. शिंगणे यांनी त्या वक्तव्याचा निषेध करत खोत यांना शिक्षा म्हणून त्यांच्या आमदारकी रद्द करण्याची मागणी केली.